For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pune Bangalore Highway Accident | सुनेला भेटायला निघाल्या.. पण वाटेतच काळाने गाठलं ; ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

10:17 AM Aug 31, 2026 IST | NEETA POTDAR
pune bangalore highway accident   सुनेला भेटायला निघाल्या   पण वाटेतच काळाने गाठलं   ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Advertisement

गोकुळ शिरगाव -पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मयूर पेट्रोल पंपासमोर रविवारी सकाळी अकराच्या सुमारास भीषण अपघातात झाला. सरनोबतवाडीवरून कागलला दुचाकीवरून पत्नी नातीला घेऊन निघालेल्या दुचाकीस्वाराला ट्रकने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये पत्नी गीता बसंत जगताप (वय ४५ रा. सहाराकॉलनी, सरनोबतवाडी) या जागीच ठार झाल्या. तर पती बसंत पंडित जगताप (वय ४५) व नात विभूती अतिशय जगताप (वय ३) हे दोघे जखमी झाले.जगताप हे आपल्या आजारी सुनेला पाहण्यासाठी दुचाकीने कागलकडे जात - होते.

Advertisement

रविवारी मयूर पेट्रोल पंपासमोर मोटरसायकल चालकाला मागून येणाऱ्या मालवाडु ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर कोसळले गेले. यामध्ये गीता या जवळपास पाच फूट ट्रकबरोबर फरपटत गेल्या व त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुदैवाने दोघे जण यामध्ये किरकोळ जखमी झाले. गीता यांच्या पश्चात पती, एक मुलगा व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. महामार्ग पोलीस व गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

दीड तास वाहतूक कोंडी
अपघातानंतर सरनोबतवाडी ते मयुर पेट्रोल पंप ब्रीजपर्यंत वाहनांची दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. अॅम्ब्युलन्सलाही अपघातस्थळी पोहचण्यासाठी वाट मिळाली नाही. घटनास्थळी उलट्या दिशेने आलेल्या अँब्युलन्समधून गीता जगताप यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथे शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. तिथे पंचनामा होऊन सांयकाळी त्यांच्यावर सरनोबतवाडी येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement

अखेर सुनेला भेटायचं राहून गेल
गीता या मनमिळावू स्वभावाच्या होत्या, मोठ्या कष्टांनी त्यांनी सरनोबतवाडी सहारा नगर येथे घर बांधलं होतं. पती सेंट्रिंग काम करतात, त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कागल येथील आपल्या सुनेला भेटायच राहूनच गेल, या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.