महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शाहजहांपूरमध्ये भीषण दुर्घटना, 12 भाविकांचा मृत्यू

07:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शाहजहांपूर : उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूर येथे दाट धुक्याच्या स्थितीदरम्यान भरधाव ट्रकने टेम्पोला टक्कर मारली आहे. या दुर्घटनेत टेम्पोतून प्रवास करणाऱ्या  12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व भाविक मदनापूर येथून गंगास्नानासाठी ढाई घाट येथे जात होते. मृतांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीणा यांनी दिली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article