Chembur School Bus Accident | मुंबईत भीषण दुर्घटना! चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, १० गंभीर जखमी
मुंबई -महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये गेले बऱ्याच तासापासुन मुसळधार पाऊस सुरु आहे..यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.. मुसळधार पाऊस इतका जोरदार होता की, शहरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत.
यातच मुंबईतील चेंबूर भागातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एक भले मोठे झाड एका स्कुल बसमध्ये पडल्याची माहिती मिळत आहे... स्कुल बसवर पडल्याने तब्बल 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेची माहिती मिळताच बचावकार्य कार्य तातडीने घटनास्थळी दाखल होत जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले..
समोर आलेल्या माहीतीनुसार,मुंबईतील चेंबूर या भागात भल्या मोठ्या झाडाखाली पिवळ्या रंगाची एक स्कुल बस थांबलेली होती. पावसाच्या पाण्यामुळे काही ठिकाणी पाणी होते. बस ज्या ठिकाणी थांबलेली होती, त्याच्याच बाजूला एक भले मोठे झाड होते. पावसाच्या पाण्यामुळे आणि वाऱ्यामुळे हे झाड कोसळून थेट स्कुलबसवर पडले. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून, यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तब्बल 10 शाळकरी मुले गंभीररीत्या जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बस टिळकनगरमधील युनिव्हर्सल शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.