For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेरेखोल नदीने ओलांडली इशारा पातळी

05:22 PM Jul 07, 2024 IST | अनुजा कुडतरकर
तेरेखोल नदीने ओलांडली इशारा पातळी
Advertisement

नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क राहावे ; सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे आवाहन

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सिंधुदुर्गात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या जनतेने सावधगिरी बाळगावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाने केली आहे. या संदर्भात तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सतर्क आवाहन केले आहे. सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी जनतेला आवाहन करताना सावधानता बाळगावी असे म्हटले आहे. ते म्हणाले,तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तेरेखोल नदीकाठच्या सर्व गावांना सूचित करण्यात येत आहे की, पुलावर पाणी आल्यास पुल ओलांडू नका. अनावश्यक कामा करीता घराबाहेर पडणे टाळावे. सतर्क रहा आणि सुरक्षित रहा असे आवाहन तहसीलदार सावंतवाडी तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन सावंतवाडी यांचे मार्फत करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.