Palus News | पलूसमध्ये खळबळ! ग्रामसभेतील प्रश्न आणि RTI वरून सरपंच अन् कार्यकर्त्यामध्ये हाणामारी
माहिती अधिकाराच्या मुद्द्यावरून पलूसमध्ये तणाव
पलूस : पलूस तालुक्यातील येथेग्रामसभेतील प्रश्न आणि माहिती अधिकाराशी संबंधित मुद्द्यावरून सरपंच आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यामध्ये झालेला बाद चिघळत जाऊन दोन्ही बाजूंनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे पलूस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी दिपक जगन्नाथ कदम (वय ३६, रा. बांबवडे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील सरपंच अरविंद हणमंत मदने आणि सदस्य विजय पवार यांनी त्यांच्या घरी येऊन ग्रामसभेतील प्रश्रांची लेखी उत्तरे मागितल्याचा राग मनात धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.यावेळी झालेल्या गोंधळात त्यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोन्याची चेन हरवली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच कुटुंबीयांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तर दुसऱ्या गुन्ह्यात सरपंच थ अरविंद मदने (वय ३९) यांनी प्र दिलेल्या फिर्यादीत दिपक कदम र यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. त त्यानुसार, माहिती अधिकाराशी द संबंधित प्रश्रांवरून गावात गैरसमज उ पसरविल्याच्या कारणावरून उ चर्चा करण्यासाठी ते कदम पं यांच्या घरी गेले असता दोघांमध्ये बाद झाला. यावेळी कदम यांनी प शिवीगाळ करत मारहाण केली तसेच म ते निघून जात असताना दगड फेकूनरि मारल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत ३ झाली आहे.या दोन्ही प्रकरणांमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून अटक अद्याप करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.