Satara News : सातारा जिल्हा परिषदेत सभापती निवडीत तणाव; सदस्यांची घोषणाबाजी!
03:13 PM Apr 04, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
जिल्हा परिषद परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात
Advertisement
सातारा : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापती यांची नावे आणि ओळखपत्रांची काटेकोर तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता.
या कडक तपासणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवला. यावेळी संतप्त सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.
Advertisement
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सदस्यांनी हाताला काळ्या फिती बांधून प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेचा निषेध केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
Advertisement