महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लहान मुलांच्या वादातून शहापुरात तणाव

10:59 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रिकेट खेळताना दोन गटांत वादावादी : किरकोळ दगडफेक, घटनेनंतर पोलीस बंदोबस्तात वाढ

Advertisement

बेळगाव : शहापूर येथील अळवण गल्ली येथे क्रिकेट खेळताना दोन गटांमध्ये वादावादी झाल्याने गुरुवारी सायंकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. एका गटाकडून तलवारीसह धमकी देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या गटाकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला. दगडफेक झाल्याने परिसरात वादाला तोंड फुटले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शहापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत दोन्ही गटातील आठजण जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. प्रियांका (वय 35), ऐश्वर्या (वय 21), मेहबूब (वय 45), इब्राहिम (वय 30), हाफिजा (वय 50) यांच्यासह तीन अल्पवयीनांचा जखमींमध्ये समावेश आहे. अळवण गल्ली येथील एका शाळेच्या मैदानावर लहान मुले क्रिकेट खेळत असताना दोन गटांमध्ये वाद झाला. एका गटाच्या दोन तरुणांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर तेथील काहीजण पुन्हा जमा झाले. एकाने तर तलवार काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर दुसऱ्या गटानेही त्याला प्रत्युत्तर म्हणून किरकोळ दगडफेक केली आहे.

Advertisement

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने दोन्ही गटांतील प्रमुखांना बोलावून घेऊन शांततेचे आवाहन केले. रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी पोलीस आयुक्त पत्रकारांशी बोलताना म्हणाले, क्रिकेट खेळताना वादावादी होऊन ही किरकोळ दगडफेक झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यामध्ये दोषी आढळलेल्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर शांतता भंग करणाऱ्या अफवा पसरवू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या घटनेनंतर परिसरात अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर नागरिकांनी शहापूर पोलीस स्थानकासमोर रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article