For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

एलिषा एकलपाटी यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे कारवार जिल्ह्यात तणाव

12:12 PM Sep 01, 2023 IST | Rohit Salunke
एलिषा एकलपाटी यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे कारवार जिल्ह्यात तणाव
Tension in Karwar district due to objectionable statement of Elisha Eklapati

कारवार : कारवार जिल्हा दलीत रक्षण मंचचे अध्यक्ष आणि येथून जवळच्या शिर्वाड येथील सिव्हिल ठेकेदार एलिषा एकलपाटी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, हिंदू देवता आणि वाल्मिकी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे कारवारसह तालुक्यात तणावपूर्ण वातावरण तयार झाले आहे.एकलपाटी यांनी तयार केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. एकलपाटी यांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांना हद्दपार करण्यासाठी हिंदू संघटनेसह अन्य संघटना रस्स्यावर उतरल्या आहेत.

Advertisement

हिंदू कार्यकर्त्यांनी येथील सुभाष सर्कल जवळ टायर पेटवून एकलपाठी यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा निषेध केला आहे. एकलपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी, अनेक हिंदू देवतांना अतिशय अश्लील आणि घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली आहे. एकलपाटी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्ला पोलीसप्रमुख, जिल्हाधिकारी यांच्याकडे करून कारवार ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे कारवार शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलिस परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहेत. एकलपाटी मूळचा तामिळनाडू राज्यातील गेल्या काही वर्षांपासून शिर्वाड येथे वास्तव्यास आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.