महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वादग्रस्त फलकामुळे आझमनगरमध्ये तणाव

11:31 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रात्रीच्या अंधारात समाजकंटकांचे कृत्य

Advertisement

बेळगाव : आझमनगर येथे औरंगजेबची छबी असलेला फलक लावल्याने एकच खळबळ माजली आहे. या फलकाला स्थानिक नागरिकांचा विरोध होताच एका रात्रीत तो फलक हटविण्यात आला. या फलकाच्या बाजूने व विरोधात सोशल मीडियावर वादंग सुरू आहे. आझमनगरहून शाहूनगरला जाणाऱ्या मार्गावर पेट्रोलपंपनजीक असलेल्या खांबावर रविवारी रात्री औरंगजेबची छबी असलेला फलक उभारण्यात आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेथे फलक उभारण्यात आला होता, त्याच्या खालीच एपीएमसी पोलिसांची पोलीस चौकी आहे. आझमनगर येथील चौकात नेहमी वर्दळ असते. त्यामुळे याच परिसरात पोलिसांची गस्तही अधिक असते. कोणतेही सण, उत्सव आले तरी आझमनगर चौक परिसरात जादा पोलीस कुमक तैनात करण्यात येते. असे असूनही एका रात्रीत औरंगजेबची छबी असलेला फलक उभारण्यात आला. फलक उभारणाऱ्यांनी त्याचे समर्थन केले आहे. हा प्रकार शाहूनगरवासियांच्या लक्षात येताच एपीएमसी पोलिसांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली. पोलिसांनी मनपाच्या मदतीने तो फलक हटविला आहे. ‘सेलेब्रेटिंग सुलतान ए हिंद द रिअल फाऊंडर ऑफ अखंड भारत औरंगजेब आलमगीर द मुघल किंग’ असा मजकूर औरंगजेबच्या छबीखाली लिहिण्यात आला आहे.

Advertisement

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान 

हा फलक हटविल्यानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले असून औरंगजेबचे फलक लावण्यात गैर काय आहे? पोलिसांनी तो का हटविला? असा प्रश्न उपस्थित करतानाच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आझमनगर परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article