For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मीराबाग बंधारा बांधकामामुळे तणाव

01:00 PM Feb 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
मीराबाग बंधारा बांधकामामुळे तणाव
Advertisement

लोकांच्या विरोधानंतरही खोदकाम सुरु : कंत्राटदाराची दादागिरी, स्थानिकांचा आक्रमक विरोध

Advertisement

कुडचडे : कुडचडे येथील मीराबाग भागात प्रस्तावित असलेल्या बंधाऱ्याचा वाद आता विकोपाला गेला आहे. रविवारी झालेल्या महासभेत हा बंधारा नको, असा ठराव ग्रामस्थांनी एकमताने संमत केला असतानाही, काल सोमवारी सकाळी कंत्राटदाराने या निर्णयाला कचऱ्याची टोपली दाखवत खोदकाम सुरू केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. काल सोमवारी सकाळी कंत्राटदाराने पोलिस संरक्षण किंवा ग्रामस्थांची संमती न घेता सदर ठिकाणी जेसीबी मशीन आणून खोदकाम सुरू केले. स्थानिक रहिवाशांनी जेव्हा हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कंत्राटदाराने नमते न घेता स्थानिकांनाच धमकावण्यास सुऊवात केली. कंत्राटदाराच्या उद्धट भाषेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आणि काही काळ घटनास्थळी बाचाबाची होऊन वातावरण बरेच तापले. घटनेचे गांभीर्य ओळखून कुडचडे पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, मीराबागवासीयांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रŽ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कंत्राटदाराला खोदकाम थांबवण्याचा आदेश दिला आणि जेसीबी मशीन तिथून हटवण्यास लावली.

देवाची ताकद गाडीने दाखवून दिली

Advertisement

विरोध असतानाही कंत्राटदार जबरदस्तीने काम पुढे नेत होता. पण तो परत जाताना त्याची गाडी बराच वेळ प्रयत्न करूनही सुरू न झाल्याने, ही ‘राखण देवा’चीच ताकद असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘जागृत देवस्थान काय असते हे आज सर्वांना कळून आले आहे. देवाची ताकद काय आहे हे त्या कंत्राटदाराला त्याच्या गाडीनेच दाखवून दिले. आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की अशा दृष्ट प्रवृत्तींचे निवारण तूच कर,’ अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्ते संकेत भंडारी यांनी व्यक्त केली.

आता माघार नाहीच...

सकाळी झालेली झटापट थांबली असली तरी ग्रामस्थांनी आता कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कंबर कसली आहे. ज्या ठिकाणी खोदकाम सुरू केले होते, त्याच ठिकाणी ग्रामस्थांनी ठिय्या मांडून आंदोलनाला सुऊवात केली आहे. ‘जोपर्यंत हा बंधारा मीराबाग भागातून रद्द केल्याचे अधिकृत पत्र मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील,’ असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

राखण देवाचा चमत्कार?

मीराबागच्या संपूर्ण वादात एक चर्चा संपूर्ण कुडचडे आणि सावर्डे परिसरात सुरु आहे. हे आंदोलन ‘राखण देव’ या जागृत देवस्थानची जागा वाचवण्यासाठी सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी महासभेवेळी देवाकडे साकडे घातले होते की, ‘या पवित्र जागेचे रक्षण तूच कर आणि जे कुणी विनाश करायला येतील त्यांना तूच धडा शिकव’. या श्र्रद्धेला बळ देणारी घटना सोमवारी घडली. कंत्राटदार जेव्हा सकाळी आपल्या नवीन आलिशान चारचाकी गाडीतून आला होता, तेव्हा त्याने स्थानिकांशी अरेरावी केली. मात्र, काम बंद पाडल्यानंतर तो परत जाताना त्याची ती नवीन गाडी काही केल्या सुरू होईना.

Advertisement
Tags :

.