Kolhapur News : डिजिटल फलक हटवल्याने कुंभोजात तणावाचे वातावरण
फलक हटवल्याच्या निषेधार्थ कुंभोज गाव बंद
हातकणंगले : कुंभोज (ता. हातकणंगले) येथील गट क्रमांक १८३१ क्षेत्रातील ३ ते ४ गुंठे जमीन नियोजित शिवतीर्थ आरक्षित जागेवर लावलेल्या छत्रापती शिवाजी महाराजांचे डिजिटल फलक अज्ञात व्यक्तीने हटवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.कुंभोज गावातील हिंदुत्ववादी संघटना व शिवप्रेमींनी निषेध नोंदवत गाव बंदची हाक देवून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
गावातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढून घटनेचा निषेध करत घोषणा देत निषेध फेरी काढण्यात आली. व्यापाऱ्यांनी दिवसभर व्यवहार बंद ठेवून गाव बंदला प्रतिसाद दिला. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाण्यातर्फे पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलीस तपास करत असून परिसरातील सी. सीटीव्ही फुटेज तपासून दोषींबर कारवाई करणार असल्याचे सांगितले. हातकणंगले पोलिसांनी संशयिता दोघांना तपासवामी ताब्यात घेतले आहे