For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हल्ला-गोळीबारामुळे मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; जमावाने दारूगोळा, शस्त्रे लुटली

06:43 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
हल्ला गोळीबारामुळे मणिपूरमध्ये पुन्हा तणाव  जमावाने दारूगोळा  शस्त्रे लुटली
Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

Advertisement

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये मंगळवारपासून पुन्हा हिंसाचार सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी गोळीबार झाल्याच्या बातम्या येत होत्या. पूर्व इंफाळमधील पाचव्या आयआरबी पोस्टवरील शस्त्रे आणि दारूगोळा चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार उघड झाला आहे. जमावाच्या या पवित्र्यानंतर मध्यरात्रीच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत शोधमोहीम सुरू केली आहे. याचदरम्यान बुधवारी एका इसमाचा मृतदेह सापडल्यामुळे हिंसाचारात एकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री विष्णूपूर जिल्ह्यातील होटक भागात गोळीबाराचा आवाज ऐकू आला. रात्री 9 च्या सुमारास पूर्व इंफाळमधील यिंगांगपोकपी येथे कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला. यावेळी काही गोळ्या बीएसएफ चौकीजवळ पडल्या. दोन्ही बाजूंनी स्वयंचलित शस्त्रांचा वापर केला जात होता.

Advertisement

गोळीबाराच्या घटनेनंतर बीएसएफ पॅम्प यिंगांगपोकपीची संपूर्ण चौकी सतर्क झाल्याचे सांगण्यात आले. गोळीबार करणाऱ्या जमावाला हटवण्यासाठी बीएसएफने इलू बॉम्ब फेकले. यानंतर बंडखोर पळून गेले आणि गोळीबार थांबला. तथापि, चिंगरेल तेजपूर परिसरात रात्री तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. येथे एका पोलीस चौकीवरही जमावाने हल्ला केला. जमावाने मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे लुटली. जमावाने 6 एके 47 रायफल, चार कार्बाईन, तीन 303 रायफल आणि दोन एलएमजीसह दारूगोळा लुटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.