महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शंभू सीमेवर तणावपूर्ण स्थिती

06:35 AM Dec 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी जोरदार संघर्ष सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या एका गटाने रविवार, 8 डिसेंबर रोजी पुन्हा दिल्लीकडे मोर्चा वळवला. शंभू सीमेवरून 101 शेतकऱ्यांचा गट निघताच त्यांचा सामना सुरक्षा दलांशी झाला. यादरम्यान शेतकरी आणि सुरक्षा दल आमने-सामने आल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या संघर्षात 8 शेतकरी जखमी झाले असून त्यांना इस्पितळात हलवण्यात आल्याचे समजते.

एमएसपीच्या कायदेशीर हमीसह विविध मागण्यांबाबत शेतकरी सातत्याने सरकारवर दबाव आणत आहेत. दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. दिल्ली-हरियाणा शंभू सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, एवढेच नाही तर रस्त्यावर लोखंडी अडथळे बसवण्यात आले आहेत. यासोबतच काँक्रीटची बॅरिकेड्सही बांधण्यात आली आहेत. या अडथळ्यांचा सामना करत शेतकरी विविध मागण्या घेऊन आंदोलन दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

रविवारी दुपारच्या सुमारास शेतकरी आंदोलकांनी दिल्लीकडे जाण्यासाठी कूच करताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर शंभू सीमेवरील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली. ‘दिल्ली चलो’ मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच पंजाबच्या सीमाभागात येणाऱ्या शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) कायदेशीर हमीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी दबाव टाकत आहेत. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने सभागृहात यावर ठोस निर्णय घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनांकडून सुरू आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article