साईराजतर्फे टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
10:51 AM Nov 06, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेला 19 नोव्हेंबरपासून व्हॅक्सिनडेपो मैदानावरती प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धासाठी 32 संघ सहभागी झाले आहेत. यावर्षी या स्पर्धेत मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, गुजरात, हैदराबाद, जम्मू काश्मिर, कर्नाटक येथून संघ सहभागी होणार आहेत. टेनिस बॉल जगतातील उत्कृष्ट क्रिकेटपटू या स्पर्धेत पहावयास मिळणार आहेत. यावर्षी या स्पर्धेतील विजेत्या संघास 2 लाख रुपये रोख व आकर्षक चषक, उपविजेत्या संघास 1 लाख रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे वैयक्तिक बक्षीसेमध्ये दुचाकी वाहन व टी.व्ही. देण्यात येणार आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article