टेनिस : अंकिता-ऋतुजा दुहेरीच्या स्पर्धेबाहेर
06:36 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नागोया
Advertisement
आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची महिला दुहेरी टेनिसमधील मोहीम लवकरच संपुष्टात आली आहे. सोमवारी येथे झालेल्या सामन्यात अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले यांना कझाकस्तानच्या युलिया पुतिनत्सेवा आणि अॅना डॅनिलिना यांच्याकडून पहिल्या फेरीतच कडवी झुंज देऊन पराभव पत्करावा लागला. निर्णायक सेट टाय-ब्रेकपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय जोडी कझाक जोडीकडून 7-5, 3-6, 5-10 अशी पराभूत झाली.
पुरुष एकेरीमध्ये, भारताचा सुमित नागल दक्षिण कोरियाच्या हाँग सेओंगचानविरुद्ध पहिल्या सेटमध्ये 3-2 अशा स्थितीत असताना पावसामुळे सामना थांबवण्यात आला. मंगळवारी पुन्हा सुरू होईल. सेऊलमध्ये नुकत्याच झालेल्या डेव्हिस कप स्पर्धेत नागल कोरियन खेळाडूंकडून आपले दोन्ही एकेरी सामने हरला होता.
Advertisement
Advertisement