कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेंडोलीच्या परशुराम नाईक मास्तर हायस्कूलचे क्रीडा स्पर्धांमध्ये यश

12:13 PM Oct 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वार्ताहर/कुडाळ

Advertisement

शालेय क्रीडा स्पर्धेत तेंडोली येथील परशुराम नाईक मास्तर हायस्कूलने सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी करीत आपले वर्चस्व कायम राखले आहे. शाळेच्या १४ वर्षाखालील मुलगे, १७ वर्षाखालील मुलगे व १७ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाने तालुकास्तरीय स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच शाळेचा दहावीतील विद्यार्थी दीपक कानेरकर याची ५१ किलो वजनी गटात फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये विभागीय स्तरावर निवड झाली. या सर्व खेळाडूंचे मुख्याध्यापक शुक्रांत समुद्रे यांनी अभिनंदन केले. शिक्षक योगेश समुद्रे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. सहाय्यक शिक्षक अशोक काळे व अमर तांडेल, शिपाई कर्मचारी शांताराम चिंदरकर, शिक्षकेतर कर्मचारी तुषार शिर्के यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # konkan news update# tendoli# sports # success
Next Article