For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान ''तेंडोली महोत्सव 2025''

12:25 PM Feb 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान   तेंडोली महोत्सव 2025
Advertisement

तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने आयोजन

Advertisement

वार्ताहर/कुडाळ
तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिर येथे 14 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत प्रथमच 'तेंडोली महोत्सव 2025' आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सांस्कृतिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे पहिले वर्ष आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत गावातील महिलांना व लहान मुलांना खुले व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांचा या महोत्सवात महत्वाचा सहभाग असणार आहे. महोत्सव कालावधीत होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत - १४ रोजी सायंकाळी ४ वाजता शोभा यात्रा, ६ वाजता महोत्सवाचा उद्घाटन सोहळा, ७ वाजता रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन, ७.३० वाजता वेशभूषा स्पर्धा- लहान गट - वय ५ ते १२ वर्षे व मोठा गट - १२ वर्षावरील, रात्री १० वाजता वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे ट्रीकसीनयुक्त 'आयोध्याधिश श्रीराम' नाटक, १५ रोजी सकाळी ९ वाजता आरोग्य शिबीर, सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू समारंभ, ६ वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा-लहान गट - वय ५ ते १२ वर्षे, मोठा गट - वय १२ वर्षावरील १६ रोजी सकाळी १० वाजता प्रश्नमंजुषा (चौथी ते दहावी) सायंकाळी ६ वाजता तेंडोली गावातील नवोदित कलाकारांचा सुरमयी शाम- कराओके शो, 7 वाजता पारितोषिक वितरण व ऋणनिर्देशन, रात्री 9 वाजता साई जळवी फिल्म्स आणि सई एंटरटेनमेंट प्रस्तुत आर्केस्टा जल्लोष मनोरंजनाचा महाराष्ट्र आणि गोवा मधील सुप्रसिद्ध लोकप्रिय गायक, वादक, कलाकारांसोबत अफलातून नृत्यांगनांचा कलाविष्कार होणार आहे.कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.