म्हैसाळ विस्तारित सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा निघाल्याने आनंदोत्सव
उमदी, वार्ताहर
जत म्हैसाळ विस्तारित सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा काढल्याबद्दल उमदी ता.जत येथे तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने उमदी गावात फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल पोतदार म्हणाले की, आज शासनाने विस्तारित सिंचन योजनेचे टेंडर काढले आहे. त्याबद्दल शासन, अधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व ६५ गावातील सर्व संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आभारी आहोत.
उपाध्यक्ष अनिल शिंदे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाणी संघर्ष समितीच्या लढ्याला आज यश प्राप्त झाले असून सिंचन योजनेचे टेंडर काढल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आम्ही आभारी आहोत.
शिवसेना शिंदे गटांचे नेते निवृत्ती शिंदे म्हणाले की, ३० वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जत पुर्व भागाला पाणी मिळावे यासाठी संघर्ष समिती रास्ता रोको, पदयात्रा, उपोषण करत आली असुन यांची शासनाने दखल घेत टेंडर काढल्याबद्दल मुख्यमंत्री यांचे जत पुर्व भागातील सर्व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटांचे तालुकाध्यक्ष सचिन होर्तीकर, चेअरमन गोपाल माळी, मानसिद्ध पुजारी, श्रीमंत परगोंड, महंमद कलाल, केशव पाटील, राहुल शिंदे, पिंटू कोकळे, दत्ता भोसले, चिदानंद संख, तानाजी चव्हाण, प्रकाश पवार सह कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.