For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोघा अट्टल चोरांकडून सात लाखांच्या दहा मोटारसायकली जप्त

11:58 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोघा अट्टल चोरांकडून सात लाखांच्या दहा मोटारसायकली जप्त
Advertisement

टिळकवाडी पोलिसांची कारवाई

Advertisement

बेळगाव : दोघा अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करून सुमारे 7 लाख रुपये किमतीच्या दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. हैदरअली मुस्लीमअली शेख (वय 30) रा. वीरभद्रनगर, नदीम शमशुद्दीन टोपीगार (वय 27) रा. अमननगर अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. या जोडगोळीने टिळकवाडी व मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोरलेल्या नऊ दुचाकी व चोरीसाठी वापरण्यात आलेली आणखी एक दुचाकी अशी एकूण दहा वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई, हवालदार महेश पाटील, सोमलिंग करलिंगन्नवर, संजू संगोटी, मल्लिकार्जुन पात्रोट, लाडजीसाब मुल्तानी व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की आदींनी ही कारवाई केली आहे. हैदरअली व नदीम हे खासगी कंपनीचे कामगार आहेत. शहरातील विविध भागात फिरून त्यांनी मोटारसायकली चोरल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी एकूण दहा वाहने जप्त केली आहेत. या जोडगोळीने आणखी कोठे गुन्हे केले आहेत का? याची चौकशी करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.