For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चारधाम यात्रेला तात्पुरती स्थगिती

06:49 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
चारधाम यात्रेला तात्पुरती स्थगिती
Advertisement

भूस्खलन, मुसळधार पावसामुळे व्यत्यय : उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर वाढला

Advertisement

वृत्तसंस्था/ देहराडून

उत्तराखंडच्या गढवाल भागात 7 आणि 8 जुलै रोजी मुसळधार ते अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज पाहता रविवारी चारधाम यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली. यात्रेकरूंच्या सुरक्षेचा विचार करून यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले. चारधाम यात्रेला निघालेल्या भाविकांनी हवामान सुधारेपर्यंत ते ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी थांबावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

हवामान खात्याने गढवाल विभागात 7 आणि 8 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्मयता वर्तवली आहे. त्यामुळे 7 जुलै रोजी भाविकांनी ऋषिकेशच्या पलीकडे चारधाम यात्रेसाठी निघू नये. चमोली, पौरी, ऊद्रप्रयाग, पिथौरागढ, बागेश्वर, अल्मोडा, चंपावत, नैनिताल आणि उधम सिंग नगर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर हरिद्वार, देहराडून, उत्तरकाशी आणि तिहरीमध्ये मुसळधार पावसाची शक्मयता आहे.

उत्तराखंडच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन होत असून बद्रीनाथकडे जाणारा महामार्ग ठप्प झाला आहे. डोंगरावरून माती आणि दगड खाली पडल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. दुसरीकडे, शनिवारी चमोली जिह्यात दरड कोसळल्यानंतर डोंगरावरून कोसळलेल्या खडकांमुळे हैदराबादमधील दोन भाविकांचा मृत्यू झाला. दोघेही बद्रीनाथहून मोटारसायकलवरून परतत होते. ऊद्रप्रयागमध्ये पावसामुळे तीन मजली इमारत कोसळली.

नद्यांना उधाण, दरडीही कोसळल्या

उत्तराखंडमध्येही नद्यांना उधाण आले आहे. अलकनंदा नदी जोशीमठ जवळील विष्णू प्रयाग येथे धोक्मयाच्या चिन्हाजवळून वाहत आहे. पावसामुळे बाल गंगा आणि भिलंगणा नद्यांवर अतिरिक्त गाळ साचल्याने गुन्सोला हायड्रो पॉवर आणि स्वस्तिक पॉवर प्रकल्पाचे उत्पादनही विस्कळीत होत आहे, तर पिथौरागढमधील दर्मा येथील पूल वाहून गेला आहे. त्याचवेळी मोहन येथील पणयाली नाल्यावर बांधलेला पूलही तुटला आहे. तर चीन सीमेला जोडणाऱ्या कैलास रस्त्यावर बांधलेला बेली पूलही धोक्मयात आला आहे.

Advertisement
Tags :

.