अचानक वळणाऱ्या कंटेनरला टेम्पो ट्रॅव्हल्सची धडक
मालवणातील अंगणवाडी सेविका व मदतनीस जखमी
प्रतिनिधी
बांदा
मुंबई - गोवा महामार्गावर इन्सुली कोठावळेबांध येथे अचानक वळणाऱ्या कंटेनरला टेम्पो ट्रॅव्हलरची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलर मधील वीस पैकी चार महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्यात. तर काहींना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर कंटेनर चालकाने पळ काढला. अपघातानंतर तब्बल एक तासाने उशिरा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. अपघातातील जखमींना स्थानिक ग्रामस्थांनी उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी सावंतवाडी व ओरोस येथे पाठविले. टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्व प्रवासी मालवण मधील असुन अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून काम करत आहेत. त्यासर्व जणी गोवा येथे पर्यटनासाठी जात होत्या.