कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाडनजीक अपघातात टेम्पोचालक जागीच ठार

01:25 PM Mar 11, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

खेड :

Advertisement

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महाड हद्दीतील दासगावनजीक रविवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास टेम्पो-ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कैलास गोपाळ बंडगर (38 रा. नागाव-कोल्हापूर) या टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही वाहनांतील अन्य सहाजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Advertisement

विजय इंगळे (40 रा. खारघर), इक्बाल तडवी, उज्ज्वला तडवी, आलिया तडवी (4 वर्ष), शिवन्या तडवी (दीड वर्ष) यांच्यासह ट्रकचालक संजीव भालेराव (35 रा. सुतारपाडा-ठाणे) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने महाड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले यातील ट्रकचालक संजीव भालेराव व टेम्पोतील विजय इंगळे यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त कळताच महाड पोलीस व मदतकर्ते घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य केले. अपघातामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोंळबा होवून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोचालकाला जागीच प्राणास मुकावे लागले. दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचाही चुराडा झाला. दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजुला हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत होताच रस्त्यात अडकलेल्या वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article