मूर्ती तस्करीवर आधारित ‘टेम्पल रेडर्स“
आशुतोष गोवारिकर यांच्याकडून घोषणा
प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर आता एक डॉक्यू-ड्रामा सीरिज घेऊन येत आहेत. याचे नाव ‘टेम्पल रेडर्स“ असून ही सीरिज भारतातील मंदिरांमधून मूर्तींची चोरी आणि त्याच्या अवैध तस्करीच्या आंतरराष्ट्रीय टोळीवर आधारित असेल.
टेम्पल रेडर्समध्ये खऱ्या घटनांना रंजक आणि फिल्मी पद्धतीने दर्शविण्यात येणार आहे. याचा मुख्य उद्देश भारताचा सांस्कृतिक वारसा वाचविणे आणि मंदिरांमधून मूर्ती चोरीच्या समस्येला लोकांसमोर आणणे आहे.
ही सीरिज तुडिप एंटरटेनमेंट आणि रिव्हरलँड एंटरटेनमेंटच्या सहकार्याने आशुतोष गोवारिकर प्रॉडक्शन्सकडून निर्माण केली जात आहे. याची कहाण राघव खन्ना यांनी लिहिली आहे. तर निर्मिती दीप्ति अग्रवाल, तुषार अपशंकर, जयश्री खन्ना आणि राघव खन्ना मिळून करत आहेत. तर याच्या सहनिर्मात्या प्रियांका चौधरी-गोवारिकर आहेत.
आशुतोष हे मुख्यत्वे ऐतिहासिक, सामाजिक ड्रामा आणि भव्य कॅनव्हासयुक्त चित्रपटांसाठी ओळखले जातात. स्वत:च्या चित्रपटांमध्ये भारतीय इतिहास, संस्कृती आणि देशभक्तीला विस्ताराने दर्शविणारे दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे.