महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

स्वार्थी कारणासाठी मंदिर-मशीद वाद

10:24 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एसडीपीआयचे चन्नम्मा चौकात आंदोलन

Advertisement

बेळगाव : उत्तर प्रदेश येथील ज्ञानवापी मशिदीतील तळमजल्यात पूजा करण्यासाठी न्यायालयाने दिलेला निर्णय धक्कादायक आहे. कायद्यानुसार यथास्थितीत ठेवणे आवश्यक असताना दिलेला निर्णय चुकीचा असल्याचे सांगत एसडीपीआय संघटनेने चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन केले. वाराणसी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या निवृत्तीच्या एक दिवस आधी ज्ञानवापीमध्ये पूजा करण्याचा दिलेला निर्णय अत्यंत आघातकारी आहे. गेल्या चारशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या मशिदीमध्ये नमाज, प्रार्थना करण्यात येत आहे. केवळ राजकीय अधिकार मिळविण्यासाठी मशीद-मंदिर विवाद निर्माण करण्यात आला आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानेच अशी कृती करण्यात आली आहे. यापूर्वी बाबरी मशीद-मंदिर वाद निर्माण करून देशात हत्याकांड घडवून आणण्यात आले आहे. राजकारण्यांनी अशाप्रकारचे द्वेष निर्माण करणे बंद करावे, सामाजिक सलोखा निर्माण करावा, अशी मागणी करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article