अणसुर येथील देव मुळपुरुष समंध भवानी मंदिर वर्धापन दिन उद्या
01:06 PM Jan 08, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
वेंगुर्ला तालुक्यातील खालचे अणसुर येथील श्री देव मूळपुरुष समंध भवानी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. या वर्धापन सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. यामध्ये सकाळी १० वाजता सत्यनारायणाची महापूजा होईल. दुपारी १ ते ३ महाप्रसाद आणि सायंकाळी भजनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रात्री ९ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचे नाटक संपन्न होणार आहे तरी सर्वांनी वर्धापन दिन सोहळ्याला सर्व भक्तांनी सहपरिवार उपस्थित राहून कृपाशीर्वाद घ्यावा असे आवाहन बाळा मालवणकर यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement