वृक्ष-रोपांच्या वाढीसह कमी होते तापमान
हिरवाई वाढून वाचविले जाऊ शकतात लाखो जीव
जगभरातील शहरांमध्ये जर हिरवाईला 30 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले असते तर उष्णतेच्या लाटेशी निगडित सुमारे 11.6 लाख मृत्यू टाळले जाऊ शकते. यासंबंधीचा खुलासा एका अध्ययनानंतर करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मोनाश युनिव्हर्सिटी, मेलबर्नच्या वैज्ञानिकांनी हे अध्ययन केले आहे. जगातील 11,534 शहरी क्षेत्रांमध्ये 2000-19 दरम्यान हिरवाईत संभाव्य वृद्धीच्या आधारावर उष्णतेशी संबंधित मृत्यूदरात संभाव्य घटविषयक अनुमान व्यक्त करणे हा या अध्ययनाचा उद्देश होता. याकरता संशोधकांनी 53 देशांच्या 830 ठिकाणांवरून जमविण्यात आलेली हवामान आणि मृत्यूदराशी संबंधित आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.
हे अध्ययन ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ नावाच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. या विषयातील हे पहिलेचे अध्ययन असून यात हिरवाईद्वारे तापमान आणि आरोग्यावर होणारा दुहेरी प्रभाव, शीतलन आणि अन्य आरोग्य लाभाची एकत्रित गणना करण्यात आली आहे. भविष्यात शहरी क्षेत्रात हिरवाईचा पुरेसा विकास न झाल्यास उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूदराची स्थिती आणखी गंभीर होऊ शकते असे अध्ययनाच्या निष्कर्षात म्हटले गेले आहे. उदाहरणार्थ 2090-99 दरम्यान दक्षिणपूर्व आशियात उष्णतेशी निगडित मृत्यूदर 16.7 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अनुमान आहे.