For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पार्किंगच्या वादातून तरुणाचा खून; टेंभुर्णीत सहा जणांविरुद्ध गुन्हा

04:45 PM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पार्किंगच्या वादातून तरुणाचा खून  टेंभुर्णीत सहा जणांविरुद्ध गुन्हा
Advertisement

टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. नागनाथ मच्छिंद्र जाधव (41, रा. वेणेगाव, ता. माढा) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी रात्री नाळेवस्ती परिसरात ही घटना घडली.

Advertisement

नाळेवस्ती येथे पार्किंगच्या जागेवरून सद्दाम पटवारी आणि संशयित आरोपी राज कदम यांच्यात वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी नागनाथ जाधव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयितांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. वाद वाढल्यानंतर समाधान चौधरी आणि सागर कुटे यांनी चाकूने नागनाथ यांच्या पाठीवर व मांडीवर वार केल्याचा आरोप आहे.

गंभीर जखमी नागनाथ यांना प्रथम टेंभुर्णीतील खासगी रुग्णालयात, त्यानंतर अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत सद्दाम पटवारी हेही जखमी झाले आहेत.

Advertisement

याप्रकरणी नागनाथ यांचे भाऊ महेश जाधव यांच्या फिर्यादीवरून राज कदम, समाधान चौधरी, रणजीत पवार, सागर कुटे आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.