Solapur : टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयाने घेतला मोकळा श्वास
टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अतिक्रमणे हटवली
टेंभुर्णी : ग्रामपंचायत कार्यालयासमोरील आठ व ग्रामपंचायत आवारातील चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात असल्याची माहिती सरपंच सुरजा बोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिक्रमण काढल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाने मोकळा श्वास घेतला.
सरपंच सुरजा बोबडे म्हणाल्या की, टेंभुर्णी ग्रामपंचायतने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मोहिमेत सहभागी घेतला आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायतने गेल्या तीन महिन्यांपासून स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेतसर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था, महिला मंडळ, बचत गट हे सर्वजण सहभागी झाले होते. टेंभुर्णी ग्रामपंचायत परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला होता.
संरक्षण भिंत बांधावयाची होती त्यास निधीमंजूर झाला होता. टेंभुर्णी ग्रापंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानमध्ये स्पर्धेच्या रेसमध्ये होती. या स्पर्धेसाठी अतिक्रमण बाधा येत होते. हे अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे यासाठी त्यांना सूचना करण्यात आली होती. नोटीस देऊनही त्यांनीदुर्लक्ष केले. शेवटी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संजय साळुंके, विस्तार अधिकारी औदुंबर शिंदे, डी. एन. सुतार, उपसरपंच राजश्री नेवसे, योगेश बोबडे, जयवंत पोळ आदी उपस्थित होते.