Sangli News: केंद्र शासनाकडून अतिरिक्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न सूरू
म्हैसाळ' आणि टेंभू विस्तारित योजनेला पुरेसा निधी मिळणे कठीण
सांगली: नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात टेंभू आणि विस्तारितसह म्हैसाळ योजनेसाठी सांगली जलसंपदा मार्फत एक हजार ९० कोटींचा प्रस्ताव सादर आला होता. केंद्र शासनाकडून अतिरिक्त निधी मिळण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सूरू आहेत.
मूळ 'म्हैसाळ' आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रापासून वंचित गावांसाठी विस्तारित योजनांना मान्यता दिली. 'म्हैसाळ' साठी सुमारे १९०० कोटी, तर 'टेंभू'साठी १७०० कोटी रुपयांना मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत सुमारे एक हजार कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र, उर्वरित निधीची व्यवस्था पुर्णत्वासाठी निधीचे आव्हान कायम आहे.
विस्तारित टेंभू योजनेसाठी कोयना धरणातून ८ टीएमसी अतिरिक्त पाण्याला मान्यतेचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने केंद्र शासनाच्या जलआयोगाला सादर केला आहे. पर्यावरण आणि अन्य परवानग्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून म्हैसाळ' आणि टेंभू विस्तारित योजनेला पुरेसा निधी मिळणे कठीण झाले.
विविध मार्गातून केली जाईल,' असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्स दौऱ्यावेळी सांगितले होते. टेंभू विस्तारित योजनेला आठ टीएमसी पाणी देण्यास राज्य शासनाच्या जलमंडळ व जलपरिषदेने मान्यता दिली आहे. एका जलवर्षात कृष्णा खोऱ्यात एकूण ५९४ टीएमसी पाणी वापराची मान्यता आहे. पुर्ण क्षमतेने योजना चालवण्यासाठी निधीची उपलब्धता कशी होणार याची सध्या जलसंपदासमोर अडचण आहे.
व्हाईट बुकमध्ये तरतूद
मार्च महिन्यात व्हाइट बुक मध्ये म्हैसाळ आणि ताकारी योजनेसाठी ४६० कोटी तर टेंभू साठी १३५ कोटींची तरतुव करण्यात आली होती. हा निधी प्राप्त झाला आहे. कामांच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने या निधीचे वितरण करण्यात येते. यावर्षी मुळ म्हैसाळ योजना आणि विस्तारित म्हैसाळ योजना यांच्यासाठी ५०० कोटी तर टेंभू योजनेसाठी ५९० कोटींची मागणी करण्यात आली होती. अधिवेशनात यावर चर्चाही झाली. परंतू तरतुव काहीच झाली नसल्याने भविष्यात योजनेच्या पुर्णत्वासाठी तारेवरची कसरत होणार आहे.