टेंबलाईवाडी-विक्रमनगर क्रीडांगणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू; आमदार सतेज पाटील यांची ग्वाही
क्रीडांगणाची केली पाहणी
कोल्हापूर प्रतिनिधी
टेंबलाईवाडी-विक्रम नगर परिसरात होणाऱ्या क्रीडांगणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. विक्रमनगर येथील क्रीडांगणाची त्यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊ असेही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.
विक्रमनगर टेंबलाईवाडी विकास मंचच्यावतीने याठिकाणी भव्य क्रिडांगण करण्यात येत आहे. विशेषता लोक वर्गणी देखील यासाठी जमा करण्यात आली आहे. आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी याठिकाणीं भेट देवून क्रीडांगणाची पाहणी केली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी क्रीडांगणासाठी लोकसहभागातून निधी जमा करण्यात येत असल्याबद्दल कौतुक केले. हे क्रीडांगण लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही देखील आमदार सतेज पाटील यांनी दिली.या क्रिंडागणाबरोबर परिसराच्या सुशोभिकरणासाठी आमदार सतेज पाटील यांनी 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर हा निधी देखील लवकरच जमा होईल असेही त्यांनी सांगितले. एक चांगले क्रीडांगण व्हावे हे तरुणांचे स्वप्न असून हे क्रीडांगण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर सात जूनला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊ असेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.आमदार पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, माजी नगरसेवक रशीद बारगीर, राजेंद्र पाटील, बबन कावळे आदींनी मनोगत व्यक्त केल. यावेळी माजी उपमहापौर सुलोचना नाईकवाडे, माजी नगरसेविका शोभा कवाळे, सचिन काटकर, सुनील धुमाळ,सागर पाटील,योगेश आझाटे, मोहसीन शेख, पिंटू भोसले, संदीप आढाव,लक्ष्मण काशीद,बबन कावडे,मंगल खुडे, विलास कांबळे,अमित कवाळे यांच्यासह विक्रमनगर टेंबलाईवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.