For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हल्दीराममधील 10 टक्के हिस्सा टेमासेकने केला खरेदी

06:06 AM Mar 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
हल्दीराममधील 10 टक्के हिस्सा टेमासेकने केला खरेदी
Advertisement

8,730 कोटी रुपयांचा करार : 500 प्रकारचे स्नॅक्सच्या उत्पादनांचा समावेश

Advertisement

नवी दिल्ली :

सिंगापूरमधील सार्वभौम गुंतवणूक कंपनी टेमासेकने हल्दीरामच्या स्नॅक्स विभागात 10 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. हा करार 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8,730 कोटी रुपये) किमतीचा आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने बुधवारी ही माहिती दिली आहे. दोन्ही कंपन्या महिन्यांपासून या करारासाठी वाटाघाटी करत होते. यूएस-आधारित खाजगी इक्विटी (पीई) ब्लॅकस्टोननेही हल्दीराममध्ये 20 टक्के हिस्सा खरेदी करण्याची ऑफर दिली होती, परंतु ही ऑफर कमी मूल्यांकनावर होती. म्हणूनच हल्दीरामने टेमासेकसोबत हा करार अंतिम केला.

Advertisement

भारताच्या जलद गतीने वाढणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) क्षेत्रातील ही विक्री अलिकडच्या काळात झालेल्या सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक आहे. बँकर्स म्हणतात की हल्दीरामचे प्रवर्तक पुढील वर्षाच्या आत प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) घेण्याचा विचार करत आहेत.

तीन कुटुंबे एनटीटी हल्दीराम ब्रँड चालवतात

भारतात हल्दीराम ब्रँड दिल्ली, नागपूर आणि कोलकाता येथे असलेल्या तीन वेगवेगळ्या कुटुंबांद्वारे चालवला जातो. तथापि, दिल्ली आणि नागपूर कुटुंबाने त्यांचे एफएमसीजी व्यवसाय हल्दीराम स्नॅक्स आणि हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल यांचे एकाच एनटीटी, हल्दीराम स्नॅक्स फूड्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विलीन केले आहेत.हल्दीरामचे स्नॅक्स सिंगापूर आणि अमेरिकेसारख्या परदेशी बाजारपेठेत देखील विकले जातात. त्याची सुरुवात 1937 मध्ये एका छोट्या दुकानापासून झाली. हल्दीरामचे स्नॅक्स सिंगापूर आणि अमेरिकेसारख्या परदेशी बाजारपेठेत देखील विकले जातात.

Advertisement
Tags :

.