For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलंगणा, मध्यप्रदेश, मणिपूर विजयी

06:32 AM Apr 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
तेलंगणा  मध्यप्रदेश  मणिपूर विजयी
Advertisement

वृत्तसंस्था / झाशी

Advertisement

येथे सुरू असलेल्या 15 व्या हॉकी इंडियाच्या वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत तेलंगणा, मध्यप्रदेश, मणिपूर तसेच दादरा-नगर हावेली यांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय नोंदविले.

या स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या ब गटातील पहिल्या सामन्यात तेलंगणाने गोवा संघाचा 5-1 अशा गोल फरकाने पराभव केला. या विजयामुळे तेलंगणा संघाने आपल्या गटातून दुसरे स्थान मिळविले आहे. त्यांनी आतापर्यंत तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. ब गटातील झालेल्या सामन्यात दादरा-नगर हावेली संघाने मिझोरामचा 6-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे ब गटात दादरा-नगर हावेली संघ तिसऱ्या स्थानावर आहेत. अन्य एका सामन्यात मध्यप्रदेशने ओडीशावर 3-2 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. मणिपूर संघाने पुडुचेरीचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.