महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतली केसीआर यांची भेट! तब्येतीची केली विचारपूस

06:38 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Telangana Chief Minister Revanth ReddY meets KCR in Haidrabad
Advertisement

उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रविवारी हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटलमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव (केसीआर) यांची भेट घेतली. केसीआर हे गुरुवारी रात्री एर्रावल्ली येथील स्वत:च्या फार्महाउसमध्ये पाय घसरून पडल्यामुळे जखमी झाले होते. त्यांच्यावर यशोदा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या ते विशेष दक्षता विभागात असून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करीत सर्वोत्तम वैद्यकीय सुविधांची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांना बरे होण्यासाठी 6-8 आठवडे लागू शकतात.

बीआरएस सर्वेसर्वा केसीआर हे सध्या रुग्णालयात वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीत आहेत. लोकांकडून मिळत असलेले समर्थन आणि शुभेच्छा पाहता ते लवकरच बरे होतील. सर्वांच्या प्रेमासाठी आभारी असल्याचे केसीआर यांच्या कन्या के. कविता यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article