For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेज मळगावकरची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

03:48 PM Apr 08, 2026 IST | अनुजा कुडतरकर
तेज मळगावकरची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल,मळगाव प्रशालेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी कुमारी तेज दत्ताराम मळगावकर हिने नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत ९२.६२ टक्के गुण मिळवत प्रथम प्रयत्नात ३९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत उत्तुंग यश संपादन केले आहे. तिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.तेज हिच्या या यशामागे तिची प्रबळ जिद्द,सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम व शिकण्याची तळमळ कारणीभूत ठरली आहे. तिच्या या यशामुळे तालुका, गाव व शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल मळगाव ऐक्यवर्धक संघाचे सचिव आर. आर. राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटीचे चेअरमन मनोहर राऊळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी व शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, माता-पालक संघ, शिक्षक-पालक संघ, माजी विद्यार्थी परिवार तसेच शारदा विद्यालय शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, सिद्धेश तेंडोलकर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व हितचिंतक यांनी तेज व तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.