For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वयाच्या २० व्या वर्षी तुटू लागले दात

06:34 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
वयाच्या २० व्या वर्षी तुटू लागले दात
Advertisement

ब्रिटनमध्ये एक 20 वर्षीय विद्यार्थिनी  एलोइस हॅरिसचे जीवन एका दुर्लभ आजारामुळे पूर्णपणे बदलले आहे. वयाच्या 20 व्या वर्षीच तिचे दात इतके कमकुवत झाले आहेत की तुटू लागले आहेत. एलोइस दरदिनी ब्रश करते, चांगली ओरल हायजीन बाळगते, तरीही तिच्या दातांची स्थिती बिघडत चालली आहे.

Advertisement

एलोइसला एक रेयर क्रॉनिक आजार असून तो तिच्या दातांना प्रभावित करतोय. याचमुळे ती आता बेडबाउंड ठरली आहे. यामुळे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे कोलमडला असून ती आता सोशलाइज करण्यास घाबरते. एलोइस इलकेस्टर येथील रहिवासी असून विद्यापीठात शिकत आहे. परंतु आजार अत्यंत गंभीर असल्याने तिला बेडवर पडून राहणे भाग पाडले आहे. तिचे दात कमकुवत होत तुटू लागल्याने अन्न चावणे अवघड ठरले आहे. लोक तिला ‘म्हातारी“सारखी दिसणारी किंवा ड्रग अॅडिक्ट समजतात. परंतु तिला एक दुर्लभ क्रॉनिक कंडिशन असून ती दातांच्या इनेमलला प्रभावित करत असल्याची पुष्टी डॉक्टरांनी दिली आहे. अशाप्रकारचे आजार म्हणजेच एमेलोजेनेसिस इम्परफेक्टा किंवा अशाप्रकारचे जेनेटिक डिसऑर्डर दातांना कमकुवत करतात.

हळूहळू वाढतेय समस्या

Advertisement

प्रारंभी दातांमध्ये कमी समस्या होती, परंतु हळूहळू ते तुटू लागले, दररोज ब्रश करूनही कुठलाच फायदा झाला नाही. आता माझ्या तेंडातील दातांची संख्या अत्यंत कमी राहिली आहे. यामुळे मी घरातून बाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहे. मित्र अन् ओळखीचे लोक माझी चेष्टा करतात, यामुळे माझे मानसिक आरोग्य प्रभावित होतेय असे एलोइस सांगते.

संबंधित आजाराचा उपचार अत्यंत महाग असून तिला फुल माउथ रिहॅबिलिटेशन आवश्यक असून यात इम्प्लांट्स किंवा क्राउन  लावून घ्यावे लागतील. परंतु एनएचएसमध्ये इतका महाग उपचार सहजपणे मिळत नाही. याचमुळे एलोइसने फंडरेजिंग सुरू केले आहे. ती गोफंड मी किंवा अशाप्रकारच्या प्लॅटफॉर्मवर निधी जमवत आहे.

Advertisement

.