कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur News: मुलीने वृद्धाला धडक दिली अन् बापावर गुन्हा दाखल झाला, कोल्हापुरातील घटना

11:29 AM Sep 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोपेड चालवित असलेल्या अल्पवयीन तरुणीसह तिच्या बापाविरोधी देखील गुन्हा दाखल

Advertisement

कोल्हापूर : अल्पवयीन तरुणी चालवित असलेल्या मोपेडची एका वृध्दाला जोराची धडक बसली. यामध्ये वृध्दासह ती संबंधित अल्पवयीन मुली जखमी झाली. हा अपघात शहरातील शांतिनिकेतन शाळेनजीक मंगळवारी सांयकाळी सहा वाजता घडला.

Advertisement

याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी 2019 चा सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार मोपेड चालवित असलेल्या अल्पवयीन तरुणीसह तिच्या बापाविरोधी देखील गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मोरेवाडी (ता. करवीर) येथील केदारनगरामधील सागर बाळासाहेब चव्हाण याची अल्पवयीन मुलगी बुधवारी सांयकाळी मोपेडवऊन जात होती.

यावेळी शहरालगतच्या शांतिनिकेतन शाळेनजीक या अल्पवयीन तरुणीचा ताबा सुटला. तिने रस्त्याच्याकडेने चालत जात असलेल्या बाबासाहेब आणू खोत (वय 66, रा. वक्रतुंड बगला, आर. के. नगर, कोल्हापूर) या वृध्दाला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत हा वृध्द गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मोपेडस्वार संबंधी अल्पवयीन तरुणी देखील किरकोळ जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघाताची राजारामपुरी पोलिसात फिर्याद दाखल झाली. त्याची दखल घेवून पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरु केली. चौकशीमध्ये वृध्दाला धडक दिलेल्या मोपेडस्वार तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.

दोषी आढळल्यास 3 वर्षाचा तुरुंगवास

न्यायालयीन सुनावणीमध्ये सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत गुह्यात सहभागी अल्पवयीन मुलाचे पालक किंवा वाहनाच्या मालकाने अल्पवयीन मुलाला वाहन देण्यास संमती दिली होती, असे जर सिध्द झाले. तर संबंधित दोषींना 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी २०१९ चा सुधारित मोटार वाहन कायदान्वये संबंधीत अल्पवयीन तरुणीसह तिचे वडिल सागर बाळासाहेब चव्हाण (रा. केदारनगर, मोरेवाडी) याच्यांविरोधी गुन्हा दाखल केला आहे.

सुधारित मोटार वाहन कायदा काय सांगतो

मोटार वाहन कायद्यात २०१९ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. या कायद्यातील मोटार वाहन कायदा कलम १९९ अन्वये, अल्पवयीन गुन्हेगारांसाठी वेगळे कलम जोडण्यात आले आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांच्या गुन्ह्यांसाठी पालक किंवा वाहन मालकाला दोषी धरण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
@kolhapur@KOLHAPUR_NEWS#kolhapur crime#Police action#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediakolhapur crime news
Next Article