टेक्नोपेंटस् आणणार आयपीओ
07:00 AM Jan 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : टेक्नोपेंटस् आणि केमिकल्स ही कंपनी आपला आयपीओ आणणार आहे. यासंबंधीच्या तयारीला कंपनी लागली असून आयपीओसाठी कागदपत्रे सादर करण्याच्या प्रयत्नात आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 500 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा विचार करत आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये आयपीओ बाजारात दाखल करण्याची योजना असून याचदरम्यान माजी प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडूलकरला ब्रँड अॅम्बासेडर बनवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तीन वर्षासाठी तेंडूलकर ब्रँड अॅम्बासेडर पदी असेल. कंपनीने 2024-25 मदये 210 कोटीचा महसूल मिळवला असून यापुढील वर्षात 450 कोटींवर पोहचण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे.
Advertisement
Advertisement