दिल्ली विमानतळावर एटीसी सिस्टीममध्ये तांत्रिक समस्या
सुमारे 300 विमानोड्डाणांना विलंब : प्रवाशांना करावी लागतेय मोठी प्रतीक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे हवाईसेवा प्रभावित झाली. विमानतळावर एअर ट्रॅकिफ कंट्रोल (एटीसी) सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे 300 विमानो•ाणांना विलंब झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट आणि अकासा एअरने एटीसी प्रणाली समस्येमुळे दिल्ली विमानतळावरील विमानो•ाणांना विलंब होत असल्याचे सांगितले आहे.
गुरुवार संध्याकाळपासून एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना विमानोड्डाणांचे फ्लाइट प्लॅन स्वयंचलित पद्धतीने मिळत नसल्याचे समजते. ही समस्या ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टीममध्ये (एएमएसएस) आली असून ती ऑटो ट्रॅक सिस्टीमला (एएमएस) माहिती प्रदान करते. दिल्ली विमानतळावरील या समस्येचा पूर्ण देशातील विमानोड्डाणांवर प्रभाव दिसून आला आहे. दिल्ली विमानतळावरील अनेक विमानो•ाणे रद्द करण्यात आली आहेत.
या सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना आता विमानोड्डाणांचे प्लॅन मॅन्युअली तयार करावे लागत असल्याने प्रक्रियेला अधिक वेळ लागतोय, यामुळे अनेक विमानोड्डाणांना विलंब होत आहे. यामुळे विमानतळावर प्रवाशांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. तांत्रिक टीम समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. देशातील सर्वात व्यग्र विमानतळांमध्ये सामील दिल्ली विमानतळावरून प्रतिदिन सुमारे 1,500 विमानोड्डाणे संचालित होतात.