For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टेक महिंद्राचा नफा 77 टक्क्यांनी मजबूत

06:47 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
टेक महिंद्राचा नफा 77 टक्क्यांनी मजबूत
Advertisement

वार्षिक उत्पन्न 13,384 कोटींवर : प्रति समभाग 30 रुपये लाभांश

Advertisement

मुंबई :

आयटी कंपनी टेक महिंद्राने चौथ्या तिमाहीत 1,167 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही 77 टक्के वाढ आहे. कंपनीने 13,556 कोटी रुपये एकूण उत्पन्न प्राप्त केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे 2.35 टक्के जास्त आहे.

Advertisement

कंपनीचे कामकाजातून मिळणारे उत्पन्न वार्षिक आधारावर 13,384 कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.98 टक्के अधिकचे आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 12,091 कोटी रुपये होता आणि त्याने एकूण 3,223 कोटी रुपये कर भरला आहे.

निकालात सामान्य लोकांसाठी काय?

संबंधीतांकडे टेक महिंद्राचे समभाग असतील, तर कंपनीचे संचालक मंडळाने समभागधारकांना प्रति समभाग 30 रुपये लाभांश मंजूर केला आहे. कंपन्या त्यांच्या नफ्यातील काही हिस्सा देतात, ज्याला लाभांश म्हणतात.

Advertisement
Tags :

.