'तेरे इश्क में' चा टीझर प्रदर्शित
मुंबई
'पिछली बार तो कुंदन था मान गया, पर इस बार शंकर को कैसे रोकोगे', म्हणत एक आगीचे बाटली फेकत धनुष ची एन्ट्री तर दुसरीकडे 'तुम मंदिर में शिवालो में पटकलो माथा मुक्ती मिल ही जाये ये जरूरी तो नही' म्हणत क्रिती सेनॉन स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेते आणि सिग्रेट पेटवण्यासाठी लायटर सुरु करते.
'तेरे इश्क में' या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमामध्ये दाक्षिणात्या सिनेमातील अभिनेता धनुष आणि बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन हे दोघेही मुख्य भूमिकेत आहे. या दोघांचे दोन वेगळे टीझर प्रदर्शित करण्यात आले आहेत. 'रांझणा' सिनेमातूनच धनुषने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. सिनेमाच्या दोन्हीही टीझर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
सिनेमाचे दिग्दर्शन 'आनंल एल राय' यांनी केले आहे. सिनेमाला संगीत 'ए आर रेहमान' यांच आहे. सिनेमा २८ नोव्हेंबर २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित होईल. सिनेमाचं कथानक 'हिंमाशु शर्मा' यांनी लिहीले आहे. तर 'भूषण कुमार' आणि 'कृष्ण कुमार' यांची निर्मिती आहे.