मकर संक्रांतीला 'जेलर २' च्या टीझर लॉन्च
12:05 PM Jan 15, 2025 IST
|
Pooja Marathe
Advertisement
जेलर २ प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद
प्रेक्षकांनी रजनीकांतच्या 'स्वॅग'चे केले विशेष प्रोमोमध्ये कौतुक
Advertisement
सुपरस्टार रजनीकांत यांचा तमिळ अॅक्शन-कॉमेडी 'जैलर'चा २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा सिक्वेल 'जैलर २' आता मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी मकर संक्रांतीला एका खास प्रोमोसह या सिक्वेलची घोषणा केली आहे.
दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांचा समावेश असलेल्या या टीझरने सोशल मिडीयावरील युझरचे लक्ष वेधले आहे. टीझरमधील सुपरस्टारच्या 'स्वॅग'चे कौतुक केले आहे. तर सुपरस्टार रजनीकांतच्या फॅन्ससाठी 'गुड न्यूज' असल्याचेही म्हणले आहे. हा सिनेमा सध्या प्री -प्रॉडक्शनमध्ये आहे आणि २०२६ मध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.
Advertisement
Advertisement
Next Article