For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : अजित दादांचा अस्थिकलश पाहताच फुटला अश्रूचा बांध

06:58 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news    अजित दादांचा अस्थिकलश पाहताच फुटला अश्रूचा बांध
Advertisement

                              अजितदादा पवार यांना सोलापूरकरांची श्रद्धांजली

Advertisement

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजितदादांच्या अस्थिकलस सोमवारी दुपारी जुनी मिल येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आणण्यात आला. यावेळी अस्थि दर्शनासाठी सोलापूरकरांनी गर्दी केली होती.

रविवारी सायंकाळी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सोलापूरकरांच्या वतीनेआयोजित शोकसभेत अजितदादा पवार यांना आदराजंली वाहण्यात आली. यावेळी अजितदादांविषयी भावना व्यक्त करताना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे डोळे आपसुकच पाणावले होते. सोमवारी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अजितदादांच्या अस्थि आल्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अस्थि दर्शन घेत अजितदादांना अभिवादन केले. यावेळी सोलापुरातील सर्व राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.