नव्या वर्षात टीम इंडियाचे सर्वाधिक सामने विदेशात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा हंगाम जूनमध्ये : इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची पहिली मालिका
वृत्तसंस्था/ मुंबई
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 फायनल ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्सवर 11 जूनपासून खेळवण्यात येईल. ऑस्ट्रेलियाकडून सिडनी कसोटी हरल्याने भारताच्या sंऊण् फायनल 2025 च्या आशा संपुष्टात आल्या आहेत. भारताला सलग तिसरी फायनल खेळण्याची संधी होती, जी खूप जवळ आली आणि गेली. आता भारतीय संघाला 2027 मध्ये होणाऱ्या sंऊण् फायनलवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 या वर्षी जूनपासून सुरू होणार आहे. भारत या चॅम्पियनशिप अंतर्गत पहिली मालिका इंग्लंडसोबत खेळणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात या वर्षी जून-जुलैमध्ये कसोटी मालिका होणार आहे. ही पाच सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये खेळवली जाईल. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्स येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडचा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज संघाचे यजमानपद भूषवणार आहे. टीम इंडियाला कॅरेबियन संघाविरुद्ध 2 सामन्यांची मायदेशात कसोटी मालिका खेळावी लागणार आहे. भारतीय संघ 2025 च्या हंगामाची सांगता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेने करेल. यानंतर टीम इंडियाला ऑगस्ट 2026 मध्ये श्रीलंकेचा दौरा करायचा आहे. ज्यात दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जातील आणि त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करेल. त्यानंतर sंऊण् 2025-27 मधील भारताची शेवटची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध असेल जे की भारतीय भूमीवर खेळवली जाईल. ज्यामध्ये पाच कसोटी सामने खेळले जातील.
इंग्लंड, न्यूझीलंड दौरा महत्वाचा
sंऊण् 2025-27 अंतर्गत भारताला इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका दौरे करायचे आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. पण जर भारताला sंऊण् 2025-27 च्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर त्याला एकतर इंग्लंड किंवा न्यूझीलंडमधील मालिका जिंकावी लागेल किंवा ड्रॉ करावी लागेल. पराभूत झाल्यास अंतिम फेरीचा मार्ग कठीण होऊ शकतो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारताचे वेळापत्रक
वर्ष प्रतिस्पर्धी यजमान सामने
जून-जुलै 2025 इंग्लंड इंग्लंड 5
ऑक्टोबर 2025 विंडीज भारत 2
नोव्हेंबर 2025 द.आफ्रिका भारत 2
ऑगस्ट 2026 श्रीलंका श्रीलंका 2
ऑक्टोबर 2026 न्यूझीलंड न्यूझीलंड 2
जाने-फेब्रुवारी 2027 ऑस्ट्रेलिया भारत 5