टीम इंडियाचा तिसरा पराभव
दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा भारतावर 4 विकेट्सनी विजय, बेथेल सामनावीर
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर झालेल्या लढतीत भारताने इंग्लंडसमोर 191 धावांचे आव्हान उभे केले होते, पण पहिले दोन गडी शून्यावर बाद झाल्यानंतरही इंग्लंडने दमदार फलंदाजी करत 19 व्या षटकातच 4 विकेट्स राखून लक्ष्य गाठले आणि मालिकेत आपले वर्चस्व कायम राखले. विशेष म्हणजे, आयर्लंडविरुद्ध दोन्ही सामने गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्ध पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. उभय संघातील तिसरा सामना दि. 7 जुलै रोजी होईल.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला 15 वर्षीय पदार्पणवीर वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 4.5 षटकांत 50 धावांची भागीदारी रचली. वैभव 14 धावा करुन बाद झाला. यानंतर इशान किशनने 49 धावांचे योगदान दिले तर अभिषेक 43 धावा करुन बाद झाला. याशिवाय, तिलक वर्माने 11 चेंडूत नाबाद 24 धावांचे योगदान दिले. कर्णधार श्रेयस अय्यरने 22 चेंडूत 37 धावांची खेळी केली. या जोरावर भारताने 7 बाद 190 धावा केल्या.
टीम इंडियाने विजयासाठी दिलेले 191 धावांचे टार्गेट इंग्लंडने 19 व्या षटकांतच पूर्ण केले. जेकब बेथेलने 46 चेंडूत नाबाद 76 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याच्या खेळीत 5 चौकार, 5 षटकारांचा समावेश होता. याशिवाय, हॅरी ब्रूकने 15 चेंडूत 39 तर टॉम बॅन्टने 32 चेंडूत 39 धावा केल्या. बेथेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताच्या अर्शदीप सिंगने 40 धावांत 3 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकांत 7 बाद 190 : अभिषेक शर्मा 24 चेंडूत 43, वैभव सूर्यवंशी 10 चेंडूत 14, इशान किशन 40 चेंडूत 49, श्रेयस अय्यर 22 चेंडूत 37, तिलक वर्मा 11 चेंडूत नाबाद 24, अवांतर 10. सॅम करन 3-33, जोफ्रा आर्चर 1-40, विल जॅक्स 1-22, डॉसन 1-27.
इंग्लंड 19 षटकांत 6 बाद 191 : हॅरी ब्रुक 15 चेंडूत 39, बेथेल 46 चेंडूत नाबाद 76, बॅन्टन 32 चेंडूत 39, आर्चर नाब्Šाद 10, अवांतर 11. अर्शदीप सिंग 3-40, हर्षित राणार 1-30, अक्षर पटेल 1-20, वरुण चक्रवर्ती 1-37.
वैभव सूर्यवंशीने मोडला तेंडुलकरचा विक्रम
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात वैभव सूर्यवंशीचा समावेश करण्यात आला आणि 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पदार्पणाची संधी देण्यात आली.
याआधी सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर 1989 मध्ये कराची येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून वयाच्या 16 वर्षे 205 व्या दिवशी पदार्पण केले होते. महिलांमध्ये सुरत येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यातून पदार्पण केले तेव्हा शेफालीचे वय 15 वर्षे 239 दिवस होते, तर सूर्यवंशीचे वय 15 वर्षे 91 दिवस आहे. या सामन्यात वैभवने दोन सणसणीत षटकार मारत वरिष्ठ संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.