अफगाणविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाचा वनडे-कसोटी संघ जाहीर
जडेजा-बुमराहला विश्रांती : शुभमन गिलकडे कॅप्टन्सीची धुरा, केएल व्हाईस कॅप्टन : युवा हर्ष दुबे, मानव सुतारला संधी
वृत्तसंस्था/ मुंबई
अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. शुभमन गिल वनडेसह कसोटी संघाचा कर्णधार असून केएल राहुलला कसोटी संघाची तर श्रेयस अय्यरकडे वनडे संघाच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वनडे संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन तीन वर्षांनंतर संघात परतला आहे.
अफगाणविरुद्ध मालिकेसाठी जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठीची तयारी या मालिकेपासून सुरू होत आहे. यामुळे माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह हार्दिक पंड्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांची यष्टिरक्षक म्हणून निवड झाली आहे. देवदत्त पडिक्कलचे तिसऱ्या क्रमांकावर पुनरागमन झाले आहे. त्यांच्यासोबत साई सुदर्शनही आहे. यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचे 3 वर्षांनंतर भारतीय वनडे संघात पुनरागमन झाले आहे. त्याने शेवटचा वनडे सामना 11 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. दुसरीकडे, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले.
कसोटी, वनडे संघात नव्या चेहऱ्यांना संधी
अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यासाठी गुरनूर ब्रार, मानव सुतार आणि हर्ष दुबे यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमधील आपल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात आपले स्थान मिळवले आहे. पंजाबचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार हा 2024-25 च्या रणजी ट्रॉफी हंगामात 7 सामन्यांत 26 बळी घेणारा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. याशिवाय, राजस्थानच्या मानव सुतार आणि विदर्भाच्या हर्ष दुबे यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने कामगिरी केली आहे.
दरम्यान, अफगाणिस्तान संघ 6 जूनपासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात दोन्ही संघ एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळतील. एकमेव कसोटी 6 जूनपासून खेळवली जाणार आहे. यानंतर एकदिवसीय सामने 14, 17 आणि 20 जून रोजी धर्मशाला, लखनौ आणि चेन्नई येथे होणार आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी संघ
शुभमन गिल (कर्णधार), के.एल.राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त प•ाrकल, नितीश कुमार रे•ाr, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मानव सुतार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.
वनडे मालिकेसाठी संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल.राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रे•ाr, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.