For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोव्हेंबरमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

01:50 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
नोव्हेंबरमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Advertisement

बॉर्डर-गावसकर मालिकेचे वेळापत्रक जाहीर : 22 नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी, मुंबई

भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावसकर मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. मालिकेतील पहिला सामना हा पर्थमध्ये होणार असून एकूण 5 सामन्यांपैकी एक सामना हा डे नाईट होणार आहे. तर या सामन्यांची तिकीट विक्री ही 4 जूनपासून सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत 32 वर्षांनंतर पाच सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे 1991-92 नंतर पहिल्यांदाच उभय संघात 5 सामन्यांची मालिका खेळवण्याची ही पहिली वेळ ठरणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होणार असून तर 7 जानेवारी 2024 ला दौऱ्याची सांगता होईल. उभय संघातील पहिला सामना पर्थ येथे 22 नोव्हेंबरपासून सुरु होईल. यानंतर अॅडलेड येथे होणारा दुसरा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. 2017 पासून ऑस्ट्रेलियन संघाला बॉर्डर-गावसकर चषक जिंकता आलेला नाही. उभय संघातील यापूर्वी झालेल्या 4 कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने गमाविल्या आहेत. 2018-19 तसेच त्यानंतर 2020-21 साली झालेल्या या दोन्ही कसोटी मालिका भारताने 2-1 अशा फरकाने जिंकल्या आहेत.

Advertisement

बॉर्डर-गावसकर मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी - 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ
  • दुसरी कसोटी - 6 ते 10 डिसेंबर, अॅडलेड (दिवस-रात्र)
  • तिसरी कसोटी - 14 ते 18 डिसेंबर, ब्रिस्बेन
  • चौथी कसोटी - 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न
  • पाचवी कसोटी - 3 ते 7 जानेवारी, सिडनी
Advertisement
Tags :

.