For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा

06:53 AM May 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement

15 सदस्यीय भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची वर्णी : हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा : पहिलाच सामना पाकिस्तानशी  

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी शनिवारी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे, तर आक्रमक फलंदाज स्मृती मानधना उपकर्णधार असेल. विशेष म्हणजे, टीम इंडियाचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 14 जूनला होणार आहे. दरम्यान, 12 जून ते 5 जुलै या कालावधीत इंग्लंडमध्ये महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे.

Advertisement

मुंबईतील बीसीसीआयच्या कार्यालयात महिला निवड समितीच्या अध्यक्षा अमिता शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पार पडलेल्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव देवजित साकिया यांनी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया जेतेपदाच्या निर्धाराने इंग्लंडमध्ये उतरेल, यात शंका नाही. यास्तिका भाटिया व ऋचा घोष या विकेटकिपर असतील. स्मृती मानधनासह शेफाली वर्मा सलामीला उतरेल. मधल्या फळीत जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष, भारती फुलमाली या फलंदाज असतील. याशिवाय, राधा यादव या अष्टपैलू खेळाडूचीही भारतीय संघात वर्णी लागली आहे. तसेच, पंजाबच्या नंदिनी शर्माची पहिल्यांदाच विश्वचषकासाठी निवड झाली आहे.

रेणुका, अरुंधती, श्रेयांकावर गोलंदाजीची धुरा

अनुभवी वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरला वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्रांती गौड आणि अरुंधती रे•ाr तिला साथ देतील. तर, स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माला फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तर श्रेयांका पाटील आणि एन श्रीचरणी देखील तिला साथ देतील.

स्पर्धेत 12 संघांचा सहभाग

या स्पर्धेत 12 संघ सहभागी होतील. आयसीसीने 12 संघांना प्रत्येकी 6 संघांच्या 2 गटांमध्ये विभागले आहे. या दोन्ही गटांमधील अव्वल दोन-दोन संघ उपांत्य फेरीत पात्र ठरतील. स्पर्धेची सुरुवात 12 जून रोजी इंग्लंड-श्रीलंका सामन्याने होईल. भारतीय संघाच्या गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे.

महिला आयसीसी टी 20 स्पर्धेसाठी जाहीर झालेला भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रे•ाr, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.

स्पर्धेची गटवारी

गट अ : ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँडस

गट ब - वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंङ

भारतीय संघाचे वेळापत्रक

4 जून - भारत वि पाकिस्तान

17 जून - भारत वि नेदरलँड्स

21 जून - भारत वि दक्षिण आफ्रिका

25 जून - भारत वि बांगलादेश

28 जून - भारत वि ऑस्ट्रेलिया.

टीम इंडियाची नरज पहिल्या जेतेपदावर

2025 मध्ये वनडे विश्वचषक जिंकलेला भारतीय संघाचे आता पहिल्या टी-20 विश्वचषकावर लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने सर्वाधिक सहा वेळा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांनी प्रत्येकी एक चषक जिंकला आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला आतापर्यंत एकही जेतेपद मिळवता आलेले नाही. यामुळे हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यावाहिल्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असेल.

Advertisement
Tags :

.