For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाने घेतली ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची ‘ग्रेट भेट’

06:05 AM Nov 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाने घेतली ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची ‘ग्रेट भेट’
Advertisement

रोहित-विराटवर ऑस्ट्रेलियन संसदेत कौतुकाचा वर्षाव

Advertisement

वृत्तसंस्था/कॅनबेरा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे पोहोचला. दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या राजधानीत पोहोचल्यावर खेळाडू अतिशय निवांत असे दिसत होते. यानंतर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट घेतली, ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. दोन दिवसीय सराव सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारतीय संघ आणि प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाची भेट घेतली. कॅनबेरा येथील संसद भवनात ही भेट झाली. यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी टीम इंडियाबरोबर सेल्फी काढला. तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने कॅनबेरा येथील संसदेत भाषणही केले. यावेळी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज यांनी रोहित विराटसह बुमराहवर कौतुकाचा वर्षाव केला.

Advertisement

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू परदेश दौऱ्यावर असताना ते अनेकदा तिथले भारतीय उच्चायुक्त किंवा स्थानिक सरकारच्या प्रतिनिधींना भेटत असतात. यावेळी भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान अल्बानीज यांची भेट घेतली. यावेळी कॅनबेरा येथील संसदेत रोहित शर्माने छोटेखानी भाषण केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी भारतीय संघातील खेळाडूंची भेट घेतली. पीएम अल्बानीज यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने या बैठकीचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी पहिल्या कसोटीत टीम इंडियासाठी विजयाचा शिल्पकार ठरलेल्या बुमराहचे विशेष कौतुक केले.

विराटच्या शतकी खेळीचे केले कौतुक

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भेटीदरम्यान विराटला म्हणाले, पर्थमधील तुझी कामगिरी खूप शानदार होती. तू अशावेळी एक चांगली खेळी केलीस जेव्हा आम्ही आधीच बॅकफूटवर होतो. यावर विराट म्हणाला, मी नेहमीच काही तरी ‘स्पाईसी करण्याचा प्रयत्न करत असतो. यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले की, भारत आपल्या ‘स्पाईसी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. यावेळी दोघांत काहीवेळ संवाद रंगल्याचे पहायला मिळाले.

शनिवारपासून टीम इंडिया खेळणार सराव सामना

भारतीय संघ 28 नोव्हेंबरला सकाळी पर्थहून कॅनबेराला पोहोचला. आता 30 नोव्हेंबरपासून पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय दिवस रात्र सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर संघासोबत नसेल. तो भारतात परतला आहे. दिवस-रात्र दुसऱ्या कसोटीच्या तयारीसाठी दोन दिवसीय सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी पिंक कुकाबुराचा बॉलचा वापरण्यात येणार आहे. पंतप्रधान इलेव्हनचे नेतृत्व अष्टपैलू जॅक एडवर्ड्स करणार आहे.

Advertisement
Tags :

.