आयसीसीच्या पुरस्कारावर टीम इंडियाचे वर्चस्व
अहमदाबाद :
भारतीय संघाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये उल्लेखनीय कामगिरी साकारली. पण, रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला अन् एका खराब दिवसाने 140 कोटी चाहत्यांचे किताब जिंकण्याचे स्वप्न मोडले. या पराभवानंतर प्रत्येक जण निराश होता, पण भारतीय खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत लाजवाब प्रदर्शन केले आणि आयसीसीच्या 12 पैकी तब्बल 6 पुरस्कार आपल्या नावावर केले. भारताने गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉल यांच्यासह प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कारही नावावर केला.
विश्वचषक पुरस्कार विजेत्यांची यादी -
- प्लेयर ऑफ द टूर्नामेंट - विराट कोहली (765 धावा आणि एक विकेट)
- प्लेयर ऑफ द मॅच (अंतिम सामना) - ट्रेविस हेड (137 धावा)
- सर्वाधिक धावा (गोल्डन बॅट) - विराट कोहली (11 सामन्यात 765 धावा)
- सर्वाधिक शतके - क्विंटन डी कॉक (चार शतके)
- स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या - ग्लेन मॅक्सवेल (वि. अफगाण 201)
- सर्वाधिक स्ट्राईक रेट - ग्लेन मॅक्सवेल (150.37)
- सर्वाधिक अर्धशतके - विराट कोहली (6 अर्धशतके)
- सर्वाधिक विकेट्स (गोल्डन बॉल) : मोहम्मद शमी (24 विकेट्स)
- स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी: मोहम्मद शमी (न्यूजीलंडविरुद्ध उपांत्य सामन्यात - 7/57)
- स्पर्धेतील सर्वाधिक षटकार - रोहित शर्मा (31 षटकार)
- स्पर्धेतील सर्वाधिक झेल - डॅरिल मिचेल (11 झेल)
- स्पर्धेतील एका यष्टीरक्षकाने घेतलेल्या विकेट्स - डी कॉक (20 विकेट्स)
विराटने मॅक्सवेलला दिलेल्या खास गिफ्टची एकच चर्चा
आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरमधील संघ सहकारी विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अंतिम सामन्यानंतर एकमेकांना मिठी मारली. तसेच यावेळी विराटने मॅक्सवेलला आपली जर्सी सुद्धा भेट दिली. याचे फोटो आयसीसीने सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. एक खेळाडू म्हणून विराट कोहली यावेळी कोणत्या दु:खातून जात असेल हे मॅक्सवेल समजू शकत होता, म्हणून त्याने विराटला मिठी मारली. यानंतर विराटने त्याच्या जर्सीवर स्वाक्षरी केली आणि मॅक्सवेलला भेट म्हणून दिली.