महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिक्षक बदली कौन्सिलिंग प्रक्रिया आजपासून

10:20 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्राथमिकसाठी 1557 शिक्षकांचे अर्ज, 30 जुलैपर्यंत चालणार प्रक्रिया

Advertisement

बेळगाव : शिक्षक बदली कौन्सिलिंग प्रक्रियेला बुधवार दि. 24 पासून प्रारंभ होणार आहे. मुख्याध्यापक, सहशिक्षक, चित्रकला शिक्षक, शारीरिक शिक्षकांचे टप्प्याटप्प्याने कौन्सिलिंग होणार आहे. प्राथमिक व माध्यमिक असे दोन गट करण्यात आले असून दि. 24 ते 30 जुलै दरम्यान ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांची बदली नेमकी कोठे होणार यासंदर्भात उत्सुकता वाढली आहे. शिक्षक बदली प्रक्रिया अनेक दिवसांपासून रखडली होती. सक्तीच्या बदली प्रक्रियेलाही न्यायालयाने स्थगिती दिल्याने ही प्रक्रियाही अनेक दिवस रखडली. मागील महिन्यात शिक्षक बदलीसाठी राज्य सरकारने वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात बदलीसाठीची शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली. यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली होती.

Advertisement

बुधवार दि. 24 पासून कौन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. क्लब रोड येथील जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात कौन्सिलिंग होणार आहे. प्राथमिक विभागामध्ये चित्रकलेसाठी 1, शारीरिक शिक्षकांसाठी 53, प्राथमिक मुख्याध्यापक 40 तर 1463 सहशिक्षकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केले आहेत. आक्षेप नोंदविल्यानंतर अंतिम यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या शिक्षकांचे क्रमांकानुसार कौन्सिलिंग होणार आहे. मंगळवारी जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात कौन्सिलिंगसाठी चाचणी घेण्यात आली. शहरासह तालुक्यातील अनेक शाळांमध्ये पदे रिक्त असल्याने बदलीची आवश्यकता होती. बदलीसाठी अर्ज दाखल केलेल्या शिक्षकांना प्रक्रियेमध्ये सामावून घेतले जाणार आहे. दि. 25 ते 27 दरम्यान प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी बदली प्रक्रिया होईल. तर 29 रोजी परस्परांतील कौन्सिलिंग होणार आहे. मंगळवार दि. 30 रोजी तांत्रिक साहाय्यक पदासाठीचे कौन्सिलिंग होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article